26 जानेवारीपर्यंत भाषण छापा अन्यथा उपोषण करेन- श्रीपाल सबनीस

January 22, 2016 1:35 PM0 commentsViews:

shripal Sabnavis 43323

पुणे –  22 जानेवारी : 89 व्या अखिल भारतीय साहित्य महामंडळावर नाराजी व्यक्त करत श्रीपाल सबनीस यांनी मंडळाविरोधात एल्गार पुकारला आहे. साहित्य संमेलनातील अध्यक्षीय भाषणाची पुस्तिका न छापल्यास येत्या 27 जानेवारीपासून सपत्नीक आपण लाक्षणिक उपोषण करू, असा इशारा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी दिला आहे. अध्यक्षीय भाषणाची छपाई न केल्याबद्दल गुरुवारीच सबनीस यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन साहित्य महामंडळाच्या कारभाराबद्दल नाराजी व्यक्त केली होती.

पिंपरीमध्ये नुकत्याच झालेल्या या संमेलनाच्या उद्घाटनासाठी श्रीपाल सबनीस यांनी लिहून तयार केलेले भाषण न छापण्याचा निर्णय साहित्य महामंडळाच्या पदाधिका-यांनी घेतला. त्यांच्या या निर्णयावर सबनीसांनी टीका केली.

लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या अध्यक्षांचं भाषण छापलं जात नाही. ते रसिकांपर्यंत पोहोचवलं जात नाही. हा एकप्रकारे राज्यघटनेचा अवमान आहे. अशा पद्धतीने असहिष्णुतेने वागण्याची ठेकेदारी महामंडळाच्या पदाधिका-यांना दिली कोणी? महामंडळ सेन्सॉर बोर्डासारखे कधीपासून वागायला लागले, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. त्याचबरोबर, अध्यक्षीय भाषणाची पुस्तिका छापण्यासाठी सबनीसांनी महामंडळाला 26 जानेवारीपर्यंतची मुदत दिली आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close