रोहितच्या आईचं दुःख समजू शकतो, मोदी झाले भावूक

January 22, 2016 7:28 PM0 commentsViews:

modi_on_rohitलखनौ- 22 जानेवारी : हैदराबाद विद्यापीठातील विद्यार्थी रोहित वेमुला याच्या आत्महत्येमुळे देशभरात पडसाद उमटत आहे. रोहितबाबत भाष्य करत असतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी भावूक झाले. ‘रोहितच्या आईचं दुःख मी समजू शकतो, एका आईनं आपला मुलगा गमावला त्यामुळे त्यांचं काय दुख आहे ते मी समजू शकतो,अशी भावना यावेळी मोदींनी व्यक्त केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (शुक्रवारी) लखनौच्या आंबेडकर विद्यापिठाच्या दीक्षांत संमारंभात उपस्थित होते. त्यावेळी बोलतांना पंतप्रधानांनी रोहीतबाबत भाष्य केलं. आणि त्यावेळी ते भावूक झाले. रोहितला आत्महत्या करावी लागली ही दुदैर्वी घटना आहे. काहीही कारणं असेल. राजकारण आपल्या जागी असतं. पण, एका आईला आपला मुलगा गमवावा लागलाय. रोहितच्या आईचं दुःख मी समजू शकतो. एका आईनं आपला मुलगा गमावलाय त्यामुळे त्यांचं काय दुख आहे ते मी समजू शकतो,असं मोदी म्हणाले. या भाषणादरम्यान काही विद्यार्थ्यांनी अचानक मोदींविरोधात नारेबाजी केली. ‘मोदी चले जाओ’च्या घोषणाही सुरू केल्या. उपस्थिती पोलीस कर्मचार्‍यांनी विद्यार्थ्यांना सभागृहातून बाहेर काढलां.

दरम्यान, पंतप्रधान मोदींच्या वक्तव्यावर काँग्रेसचे नेते कपील सिब्बल यांनी ट्वीटरवरून टीका केलीये. मोदींचं वक्तव्य हे उशिरा सुचलेलं शहाणपण आहे. तुम्हाला जर आईचं दुःख कळत असेल, तर तुमच्या मंत्र्यांनी वर्तणुकीत बदल करावा यासाठी प्रयत्न करा असा टोला सिब्बल यांनी लगावला.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close