टॅक्सीतून येऊन चोरी करणारे सराईत चोर गजाआड

January 22, 2016 7:20 PM0 commentsViews:

98arrest22 जानेवारी : टॅक्सीतून येऊन चोरी करणार्‍या दोन सराईत गुन्हेगाराना चेंबूर पोलिसांनी अटक केलीये. चेंबूर स्टेशन परिसरात या चोरट्यांनी काही दिवसांपूर्वी 5 दुकानं एकाच रात्रीतून फोडली होती. कपडे ड्राय फ्रुट अशी महागडी दुकाने होती. हे आरोपी कपड्याच्या दुकानात चोरी करत असताना दुकानात असलेल्या सीसीटीव्हीत यातील एक आरोपी कैद झाला.

रात्रीच्या वेळी टॅक्सीतून येऊन हे आरोपी चोरी करायचे. मानखुर्द आणि वडाळा परिसरात हे राहतात याची माहिती खबर्‍यांकडून चेंबूर पोलिसांना मिळाली. या चोरांना पकडण्यासाठी चेंबूर पोलिसांनी एक पथक तयार केलं आणि सईद शेख आणि अब्दुल खान या आरोपींना अटक केली. मुंबईत वेगवेगळ्या 25 पोलीस ठाण्यात या आरोपींवर गुन्हे दाखल असल्याची माहिती चेंबूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप डाल यांनी दिली.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close