पेट्रोल, डिझेलची दरवाढ मागे नाही

March 2, 2010 3:34 PM0 commentsViews: 4

2 फेब्रुवारीपेट्रोल-डिझेलचे वाढलेले दर सध्या तरी कमी होणार नाहीत, असे स्पष्ट संकेत मिळाले आहेत.या बजेटमध्ये केलेली पेट्रोल-डिझेलची दरवाढ मागे घ्यावी, यासाठी यूपीएतील मित्रपक्षांनी सरकारवर दबाव आणला आहे. काँग्रेस कोअर कमिटीची बैठक त्यावरच चर्चा करण्यासाठी आज काँग्रेसच्या कोअर कमिटीची बैठक झाली. या बैठकीत हा निर्णय झालाय. पेट्रोल-डिझेलचे दर वाढवणे हे आर्थिकदृष्ट्या अटळ आहे, असे काँग्रसने म्हटले आहे. वाढलेल्या किंमतीचा काय परिणाम होतो, याचा पहिल्यांदा काँग्रेस अभ्यास करणार आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतीवर त्याचा विपरीत परिणाम झाला तर, पेट्रोल-डिझेलचे दर कमी करण्यावर विचार होणार आहे. सहकारी पक्ष आग्रहीतृणमुल काँग्रेस आणि द्रमुकबरोबरच काँग्रेसमधल्याही काही नेत्यांचाही दरवाढ मागे घेण्याबद्दल आग्रह आहे. पण सध्यातरी यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी त्यांची मागणी फेटाळून पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या भूमिकेला पाठिंबा दिला आहे.दरवाढ मागे घ्यायला पंतप्रधान मनमोहन सिंग आणि केंद्रीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी यापूर्वीच ठाम नकार दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून समर्थनदरम्यान, यूपीएच्या घटकपक्षांमध्ये फक्त राष्ट्रवादी काँग्रेसने दरवाढीचे समर्थन केले आहे. तृणमूल काँग्रेस आणि द्रमुकने मात्र दरवाढ मागे घेतलीच पाहिजे, असा इशारा सरकारला दिला आहे. भाजप, तेलुगू देसमसारख्या विरोधी पक्षांनी दरवाढीविरोधात आज ठिकठिकाणी निदर्शने केली.तर हा मुद्दा हाताळण्यास यूपीए आघाडी सक्षम असल्याचे काँग्रेसचे प्रवक्ते अभिषेक मनू सिंघवी यांनी म्हटले आहे.

close