‘हुसेन यांना सुरक्षा देऊ’

March 2, 2010 3:41 PM0 commentsViews: 1

2 फेब्रुवारीप्रसिद्ध चित्रकार एम. एफ. हुसेन यांनी भारतात परतावे, त्यांना सर्व सुरक्षा पुरवली जाईल, असे आश्वासन केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी दिले आहे. हुसेन यांनी, कतारने देऊ केलेले नागरिकत्व स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. हिंदू-देवदेवतांचा अपमान केल्याप्रकरणी हुसेन यांच्यावर भारतात अनेक गुन्हे दाखल आहेत. त्यांच्याविरोधातले 6 गुन्हे निकाली लागलेत, असे चिदंबरम यांनी सांगितले. हुसेन यांच्याविरोधातील खटल्यांना कोणताही कायदेशीर आधार नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. हुसेन भारतात परतले तर आपल्याला खूप आनंद होईल, असेही चिदंबरम यांनी नमूद केले आहे.

close