फिल्म रिव्ह्यु : एअरलिफ्ट

January 22, 2016 10:45 PM0 commentsViews:

अमोल परचुरे, समीक्षक

अगदी अलीकडच्या काळात भारतीय सरकारनं सिरीयामधून भारतीयांना मायदेशात आणण्यासाठी जे ऑपरेशन केलं, त्याचं जगभरात कौतुक झालं. पण त्याच्या खूप वर्ष आधी भारत सरकारमधील काही संवदेनशील अधिकारी आणि एअर इंडिया यांनी मिळून जे ऑपरेशन केलं, त्याची दखल गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डनेही घेतली.

काय आहे स्टोरी ?

airlift32

कुवेतमध्ये अडकलेले एक लाख सत्तर हजार भारतीय, त्यांना मायदेशात आणण्यासाठी एअर इंडियाच्या विमानांनी भारत ते जॉर्डन दरम्यान तब्बल 488 उड्डाणं केली, एकूण 59 दिवस हे ऑपरेशन सुरू होतं. याच यशस्वी मोहिमेवर आधारित आहे ‘एअरलिफ्ट’. या विषयावर बॉलीवूडमध्ये सिनेमा बनतोय हीच स्वागतार्ह गोष्ट आहे. विषयाची भव्यता लक्षात घेऊन त्याच भव्यतेने सिनेमाची निर्मिती झालीये हेही महत्त्वाचं आहे. फक्त अशा प्रकारच्या सिनेमात फिल्मीपणा टाळण्याची गरज होती, तो मोह काही दिग्दर्शकाला टाळता आलेला नाही, हे सिनेमाचंच एकप्रकारे दुदैर्व म्हणावं लागेल.

नवीन काय ?

1990 चा काळ, सद्दाम हुसैनच्या इराकनं कुवेतवर हल्ला चढवलाय. आखाती युद्धाला सुरुवात झाली आणि त्या कुवेतमध्ये NRI म्हणजेच विदेशी भारतीय मोठ्या संख्येनं अडकून पडले. भारत आणि इराकचे मैत्रीचे संबंध असल्यामुळे या भारतीयांवर इराकी सैन्याने अत्याचार जरी केले नसले तरी बॉम्बहल्ले आणि कुवेती नागरिकांच्या कत्तलीमुळे त्यांचं आयुष्य उद्‌ध्वस्त झालंय. मायदेशापासून लांब आल्यावर बक्कळ पैसा कमवत असताना त्यांना आपल्या देशाचा विसरच पडला होता.

airlift323भारताबद्दल नकारात्मक बोलण्यात त्यांना कोणताही कमीपणा वाटत नाही, पण एवढ्या मोठ्या संकटात सापडल्यावर त्यांना मायदेशाची ओढ लागते आणि अशावेळी रणजीत कट्याल हा सर्वांना एकत्र करुन या संकटावर कशी मात करतो हे सिनेमात दिसतं. सिनेमाचा शेवट आपल्याला माहितीये, ऑपरेशन यशस्वी होणार हे प्रोमोमध्येच सांगितलेलं आहे, त्यामुळे यात सस्पेन्स वगैरे काही नाही, तरीसुद्धा शेवटपर्यंत प्रेक्षकांना गुंतवून ठेवण्यात एअरलिफ्टची टीम ब-यापैकी यशस्वी ठरलेली आहे.

रेटिंग 100 पैकी 70

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close