महाराष्ट्रातील चौघांसह 25 बालवीरांचा ‘शौर्य पुरस्कारा’नं गौरव

January 24, 2016 4:05 PM0 commentsViews:

नवी दिल्ली – 24 जानेवारी : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज महाराष्ट्रातील चौघांसह देशभरातील 25 बालवीरांचा ‘बाल शौर्य पुरस्कारा’नं सन्मान करण्यात आला. नवी दिल्लीत हा गौरव सोहळा पार पडला. दरम्यान, शौर्य सन्मान पुरस्कार प्राप्त बालवीर मंगळवारी प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्येही सहभागी होणार आहेत.

देशातील 25 बालकांना शौर्याबद्दल राष्ट्रीय बालवीर पुरस्काराने गौरवण्यात आलं. यापैकी दोन मुलांना मरणोत्तर पुरस्कार प्रदान करण्यात आलं.

Bravry awards

या पुरस्कारातील सर्वोच्च ‘भारत पुरस्कार’ नागपूरच्या गौरव सहस्त्रबुद्धेला जाहीर करण्यात आला आहे. नागपूरच्या हिंगणा रोडवरील टाकळी सीम भागात असलेल्या अंबाझरी तलावात बुडणार्‍या बुडणार्‍या चार मुलांचा जीव वाचवला होता, मात्र त्यांना वाचवताना त्याला जीव गमवावा लागला. गौरवशिवाय जळगाव जिल्ह्यातील कोथळीचा निलेश भील, वर्धा इथल्या वैभव घांगरे, मुंबईतील वाळकेश्वरचा मोहित दळवी यांचा बाल शौर्य पुरस्काराने गौरव करण्यात आला आहे.

बाणगंगा तलावात बुडणार्‍या कृष्णा पाष्टेचा जीव मोहित दळवीने वाचवला होता. त्याचबरोबर, वर्धा जिल्ह्यातल्या नंदा नदीला 2014 साली आलेल्या पुरात सापडलेल्या आपल्या काही मित्रांना वाचवणार्‍या वैभव घांगरे यांचा मुलाचाही गौरव करण्यात आला.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close