विदर्भासाठी दिल्लीवर दबाव आणा – श्रीहरी अणे

January 24, 2016 5:11 PM0 commentsViews:

Aney123

चंद्रपूर – 24 जानेवारी : स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती होणं महाराष्ट्रातून तरी शक्य नाही. महाराष्ट्र सरकार राज्य निर्माण करू शकत नाही. तिथे फक्त ठराव होतो. विदर्भातील आमदारांची संख्या लक्षात घेतली तर हा ठराव मुंबईत पास होणे शक्य नाही. त्यामुळे दिल्लीवर दबाव आणा, तो कसा आणायचा यासाठी विचार करा, असं सांगत राज्याचे महाअधिवक्ता ऍड. श्रीहरी अणे यांनी विदर्भ राज्यासाठी लढ्याचे संकेत दिले.

स्थानिक जनता महाविद्यालयात शनिवारी सायंकाळी झाल्या ‘विदर्भ गाथा’ या समारंभात त्यांनी दिल्लीवर दबाव आणण्याचे आवाहन केलं. ऍड. अणे म्हणाले, तेलंगणच्या निर्मितसाठी 1200 तरुणांनी बलिदान दिले. विदर्भासाठी असे रक्त सांडविण्याची दिल्लीकर वाट बघत असतील तर ते अयोग्य आहे. आम्ही वीज निर्माण करतो, कोळसा त्यांना देतो, तिकडच्या प्रकल्पासाठी आमचे जंगल देतो. विदर्भातील शेतकर्‍यांनी ठरविले तर महाराष्ट्रावर उपाशी राहायची पाळी येईल.

 विदर्भाच्या भावनांचा भडका उडाला तर त्याची किंमत कुणालाही भरून देता येणार नाही, असं मत यावेळी श्रीहरी अणे यांनी व्यक्त केलं. तसंच, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी साहित्य संमेलनादरम्यान केलेल्या वक्तव्याबद्दल बोलताना, साहित्यिकांना महाराष्ट्राएवढाच विदर्भ प्रिय आहे. विदर्भातील साहित्यिकांनी विदर्भाबद्दल का बोलू नये? विदर्भातील मराठीपण, हिंदीपण समजून घ्यावं, असं आवाहनही त्यांनी केलं.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close