प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं ‘स्पोर्ट्स हिरोज’नी गायलं राष्ट्रगीत

January 24, 2016 6:01 PM0 commentsViews:

saasda

मुंबई – 24 जानेवारी :  ‘जन गण मन’ या राष्ट्रगीताला आज 66 वर्ष पूर्ण होत आहेत. त्याचबरोबर प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर स्पोर्ट्स हिरोंच्या ‘राष्ट्रगीता’च्या व्हिडीओचं आज (रविवारी) मुंबईतील ताज लँड हॉटेलमध्ये अनावरण करण्यात आलं. भारतातील स्पोर्टस लिजेंड्सचं हे पहिलंच राष्ट्रगीत आहे.

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर, सुनील गावस्कर, गगन नारंग, बायचुंग भूतिया, धनराज पिल्ले, महेश भूपती, सानिया मिर्झा या क्रीडा क्षेत्रातील दिग्गजांनी व्हिडीओत ‘जन गण मन’ हे राष्ट्रगीत म्हटलं असून मुंबईत आज सर्व खेळाडूंच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.

माजी क्रिकेटपटू निलेश कुलकर्णीच्या संकल्पनेतून साकारलेल्या या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व खेळाडू आजच्य मुलांना अभ्यासासोबतच खेळांकडे वळण्याचाही संदेश देत आहेत. अभिजीत पानसे यांनी या गाण्याचं दिग्दर्शन केलं असून राम संपत यांनी संगीत दिग्दर्शन केलं आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close