नौदलाचे विमान कोसळले, 2 पायलट ठार

March 3, 2010 8:21 AM0 commentsViews: 2

3 फेब्रुवारीहैदराबादमध्ये नौदलाच्या सागर पवन या ताफ्यातले किरण- MK- 2 हे विमान आज सकाळी कोसळले. यात विमानातले दोघे पायलट मृत्यूमुखी पडले आहेत. तर चौघे जखमी झाले आहेत. जखमींवर हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहेत. विमानाचे एअर शो म्हणजेच प्रात्यक्षिक सुरू असताना हा अपघात झाला. बेगमपेट विमानतळापासून जवळच ही घटना घडली. विमान एका दुमजली इमारतीवर कोसळले. घटनास्थळी अग्निशमन दल आणि पोलिसांनी वेळेत धाव घेऊन मदतकार्य सुरू केले.हे विमान कसरत करत हवेत खालच्या दिशेने येऊन पुन्हा वरती जाण्याच्या तयारीत होते. वर जाण्याकरिता इंजीनात जी उर्जा निर्माण व्हावी लागते, ती निर्माण झाली नसावी आणि त्यामुळे हे विमान कोसळले असावे असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

close