26 जानेवारी परेडवर आयसिसचं सावट, दिल्लीत पोलिसांचा खडा पहारा

January 25, 2016 2:15 PM0 commentsViews:

delhi_security43नवी दिल्ली – 25 जानेवारी : 26 जानेवारी अर्थात प्रजासत्ताक दिनाच्या परेडवर आयसिस हल्ल्याचे सावट निर्माण झाल्यामुळे देशभरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. देशभरात हायअलर्ट जारी करण्यात आलाय. सुरक्षा व्यवस्था आणखी वाढवण्यात आली आहे. नवी दिल्लीसह सर्वच मेट्रो शहरात सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्यात आली आहे. विमानतळ, मोठी रेल्वे स्थानकं, कोर्ट, मोठी रुग्णालयं या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त, आणि राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. गुप्तचर विभागही दहशतवाद्यांच्या हालचाली आणि टेलिफोन संभाषणांवर नजर ठेवून आहे. 20 हजार दिल्ली पोलिसांचे जवान, अर्ध सैनिक दलाचे जवान आणि शार्प शूटर्स दिल्लीत टप्प्यावर तैनात करण्यात आले आहेत.

पंतप्रधान मोदी आणि ओलांद टार्गेट

26 जानेवारीला राजपथावर होणारी परेड आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी, या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे फ्रान्सचे अध्यक्ष फ्रान्स्वाँ ओलांद हे दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर आहेत. इंटेलिजेंस ब्युरोनं दिलेल्या इशार्‍यानुसार ISIS ने आपला मोर्चा भारताकडे वळवला आहे. 26 जानेवारी च्या कार्यक्रमावर हल्ला करुन मोदी आणि ओलांद यांना ठार करण्याची दहशतवाद्याची योजना आहे. इतकेच नाही तर रेल्वे स्टेशन्सला सुद्धा दहशतवादी टार्गेट करु शकतात अशी IBची माहिती आहे.

मुंबईसह राज्यात कडक सुरक्षा

देशाची आर्थिक राजधानी मुंबईत चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आलीये. मुंबईच्या सुरक्षेचा विचार करताना, सागरी किनार्‍याची सुरक्षा व्यवस्था हा महत्त्वाचा मुद्दा ठरतो. मुंबईच्या सागरी किनार्‍यांवरची सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्यात आलीये. मुंबईतील प्रमुख लोकल स्टेशनावर सुरक्षा वाढवण्यात आलीये. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी अतिरिक्त सुरक्षा तैनात करण्यात आलीये. त्यापाठोपाठ पुणे, औरंगाबाद, नाशिकमध्ये कडक सुरक्षा करण्यात आलीये. राज्याची उपराजधानी नागपूरमधील सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. रेल्वे स्टेशन, विमानतळावर अतिरिक्त कुमक तैनात करण्यात आली आहे. प्रवाशाची चौकशी केली जात आहे. कुठलेही सामान स्कॅनिंग केल्या शिवाय रेल्वे स्टेशनमध्ये कुणालाही प्रवेश दिला जात नाहीये. शहारातील हॉटेल्स आणि लॉज मधील रेकॉर्डही तपासल्या जात आहे.

काश्मिरमध्ये खडा पहारा

26 जानेवारीच्या पार्श्वभूमीवर काश्मीर खोर्‍यात लष्कराचा खडा पहारा आहे. 26 जानेवारी आणि 15 ऑगस्टच्या दरम्यान काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यांची शक्यता जास्त असते. त्यामुळे लष्कर आणि इतर सुरक्षा यंत्रणा काश्मीरवर बारीक नजर ठेवून आहेत. बारामुल्ला, पूंछ, श्रीनगगर, पहलगाम, कारगिल या सर्व ठिकाणी सुरक्षा आणखी कडक करण्यात आली आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close