औरंगाबादेत उर्दू शाळेतील 25 हजार विद्यार्थ्यांनी गायलं ‘सारे जहाँ से अच्छा’

January 25, 2016 4:57 PM0 commentsViews:

औरंगाबाद – 25 जानेवारी : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व संध्येला हिंदू-मुस्लिम एकतेच दर्शन घडवत औरंगाबादेत 25 हजार विद्यार्थ्यांनी ‘सारे जहाँ से अच्छा हिंदुस्थान हमारा’ हे गीत गाऊन विश्वविक्रमासाठी प्रयत्न केला. औरंगाबादेतील उर्दू शाळा आणि मदरशांमधल्या विद्यार्थ्यांनी सुंदर आवाजात ‘सारे जहाँ से अच्छा’ गीत हे म्हटलंय.abad_sarejhanse

यावेळी विभागीय आयुक्त दांगट आणि पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्यासह स्थानिक राजकीय नेतेही उपस्थित होते. देशातील हिंदू मुस्लिम एकता वाढवण्यासाठी अशा देशभक्तीपर गीतांची आवश्यकता आहे आणि देशातील सर्व धर्मांचे लोक बंधूभावाने राहतात अशी भावना काही मुस्लिम विद्यार्थ्यांनींनी व्यक्त केली.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close