कर्नल संतोष महाडिक यांना मरणोत्तर शौर्यचक्र

January 25, 2016 6:37 PM0 commentsViews:

santosh_mahadikनवी दिल्ली – 25 जानेवारी : कुपवाडा इथं झालेल्या चकमकीत शहीद झालेले सातार्‍याचे सुपुत्र कर्नल संतोष महाडिक यांना मरणोत्तर शौर्यचक्र जाहीर करण्यात आला.

मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात जम्मू-काश्मिरमध्ये कुपवाडाच्या दाट जंगलाच्या परिसरात दहशतवादी लपून बसले असल्याची खबर मिळाल्यानंतर शोधमोहिम हाती घेण्यात आली होती. त्याचे नेतृत्त्व कर्नल संतोष महाडिक करत होते. दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र तिथे त्यांना वीरगती प्राप्त झाली. 1998 मध्ये ते लष्करात विशेष दलात दाखल झाले आणि अतुलनीय शौर्याबद्दल त्यांना शौर्य पदकाने गौरवण्यात आलं होतं. कुपवाड्यातील कामगिरीची दखल घेत संतोष महाडिक यांना मरणोत्तर शौर्यचक्र जाहीर करण्यात आलं आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close