राहुरीत दोघांची गोळ्या घालून हत्या

March 3, 2010 8:50 AM0 commentsViews:

3 फेब्रुवारीअहमदनगरमधील राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा इथे दोघांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. अशोक मुसमाडे आणि दत्तात्रय येवले हे दोघेजण या गोळीबारात ठार झाले आहेत. जनावरांच्या चार्‍यासाठी वापरल्या जाणार्‍या उसाच्या वाढ्याच्या खेरदी-विक्रीच्या व्यवहारातून ही हत्या झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. या गावात या उसाच्या वाढ्याची खरेदी-विक्री करण्यासाठी नगरचे व्यापारी येतात. पण या व्यापाराला मुसमाडे आणि येवले यांचा विरोध होता. त्यातूनच त्यांची हत्या झाली असावी, असाही पोलिसांचा संशय आहे. घटनास्थळी पाच काडतुसे सापडली आहेत.

close