गॅरी सोबर्सचा आवडता क्रिकेटर कपिल

March 3, 2010 9:55 AM0 commentsViews: 1

3 फेब्रुवारीक्रिकेटमधील आतापर्यंतचे सर्वोत्तम ऑलराऊंडर म्हणून वेस्ट इंडिजच्या गॅरी सोबर्स यांचे नाव घेतले जाते. पण स्वत: सर सोबर्स यांचा सगळ्यात आवडता ऑलराऊंडर क्रिकेटर आहे, कपिल देव… सोबर्स यांनी मुंबईत भारतीय मीडियासमोर तसे बोलून दाखवले आहे. भारतीय टीमने 1971मध्ये बलाढ्य वेस्ट इंडिजला त्यांच्याच भूमीत हरवण्याचा पराक्रम केला होता. भारतीय टीमने परदेशात जिंकलेली ही पहिली टेस्ट सीरिज. युनिव्हर्जन स्पोर्ट्स ऍन्ड आर्ट्स फाऊंडेशन या संस्थेने तेव्हाच्या भारतीय टीममधल्या खेळाडूंचा जंगी सत्कार आयोजित केला आहे. यात गॅरी सोबर्स यांच्या हस्ते वाडेकर वॉरिअर्सचा सत्कार करण्यात येणार आहे. उद्या मुंबईत हा सत्कार समारंभ होणार आहे. त्यासाठीच सर सोबर्स मुंबईत आले आहेत.

close