‘भारत सरकार मला सुरक्षा देऊ शकत नाही’

March 3, 2010 10:13 AM0 commentsViews: 5

3 फेब्रुवारीकतारमध्ये मी पूर्ण स्वातंत्र्याचा उपभोग घेऊ शकेन…आता कतार हा माझा देश आहे…इथे माझ्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर कोणी बंधन घालणार नाही…मी इथे आनंदात आहे… भारतातील सध्याचे सरकार मला सुरक्षा देऊ शकत नाही. त्यामुळे अशा देशात मी राहू शकत नाही…हा उद्वेग आहे, विख्यात चित्रकार एम. एफ. हुसेन यांचा. कतारचे नागरिकत्व मिळाल्यानंतर हुसेन यांनी आता आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. येथील राजकारणी हे फक्त मतांवर डोळा ठेवून वागतात. माझे भारतावर प्रेम आहे. भारत ही माझी मातृभूमी आहे. पण भारताने मला नाकारले आहे. हे सांगताना मला खूप दु:ख होत आहे…अशा शब्दात हुसेन यांनी खंत व्यक्त केली आहे. जेव्हा संघ परिवाराने मला टार्गेट केले होते, त्यावेळी सगळ्यांनी मौन बाळगले. राजकीय नेते, कलाकार, बुद्धिवंत कोणीच माझ्या बाजूने बोलण्यास उभे राहिले नाही…पण मला माहित आहे की भारतातील 90 टक्के लोक माझ्यावर प्रेम करतात. ते पे्रम माझ्या सोबत आहे…केवळ 10 टक्के लोक, ज्यामध्ये काही राजकारणी आहेत जे माझ्या विरोधात आहेत…असेही हुसेन म्हणाले आहेत.हुसेन यांना कतारने नागरिकत्व दिले आहे. त्यानंतर हुसेन यांनी भारतात परतावे, त्यांना सर्व सुरक्षा पुरवली जाईल, असे आवाहन केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी दिले होते.

close