पुण्यात 1 कोटी किंमतीचे हेरोईन जप्त

January 26, 2016 7:19 AM0 commentsViews:

Drugs nnपुणे – 26 जानेवारी : पुणे पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने सोमवारी शनिवारवाड्याजवळ तब्बल एक किलो 100 ग्राम हेरोइन विकण्यासाठी आलेल्या दोन जणांना अटक केलीये. हे दोघेही मुंबईचे राहणारे असून पुण्यात समीर नावाच्या व्यक्तीला या हेरोइनची डिलिव्हरी देण्यासाठी ते शनिवारवाड्याजवळ थांबले होते. पोलिसांनी जप्त केलेल्या हेरोइन ची किंमत ही आंतराष्ट्रीय बाजारामध्ये सुमारे एक कोटी रुपये इतकी आहे. अमली पदार्थाची किती मोठ्या प्रमाणावर मागणी पुण्यात होतेय हे यावरून स्पष्ट होतंय.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close