भूमाता ब्रिगेडच्या महिलांची शनीशिंगणापूरच्या दिशेने कूच

January 26, 2016 1:42 PM0 commentsViews:

bhumataअहमदनगर – 26 जानेवारी : आज सगळीकडे देशभर प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा होतोय. पण त्याचवेळी नगरमध्ये शनि शिंगणापुरात नेमकं काय होणार याकडेही उभ्या महाराष्ट्राचं लक्षं लागलंय. कारण शनि चौथर्‍यावर महिलांना प्रवेश मिळवून देण्यासाठी भूमाता ब्रिगेड आंदोलन करणार आहे. किंबहुना याच आंदोलनासाठी कोल्हापुरातून महिला निघाल्यात देखील आहे.

पण शनि शिंगणापुरचे स्थानिक ग्रामस्थ मात्र चौथर्‍यावरील महिलांच्या प्रवेश बंदीवर आजही ठाम आहे. भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई या फक्त स्टंटबाजीसाठी हे आंदोलन करत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.

शिवसेना आणि सनातन संस्थेनेही महिलांच्या चौथर्‍यावर चढण्याला विरोध केलाय. मात्र, आमचं आंदोलन हे लोकशाही मार्गानं करत असल्याचं भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्ष तृप्ती देसाई यांनी सांगितलंय.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close