156 सेवेसह ‘आपले सरकार’ पोर्टलची विस्तारित सेवेचं आज लोकार्पण

January 26, 2016 11:12 AM1 commentViews:

CM in UArangabadमुंबई – 26 जानेवारी : ‘आपले सरकार’ या पोर्टलच्या विस्तारित सेवेचं लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं. गेल्या वर्षी 26 जानेवारीला या सेवेची सुरूवात करण्यात आली होती. यात आतापर्यंत 47 सेवा देण्यात येत होत्या. ही संख्या आता 156 इतकी करण्यात आली आहे. यामुळेच आता महाराष्ट्र हे देशातलं सर्वाधिक ऑनलाईन सेवा देणारं राज्य ठरलं आहे.

या सेवेअंतर्गत सेवा हमी कायदाचाही समावेश करण्यात आला आहे. या पूर्वीही सेवा राज्यातील सहा जिल्ह्यात लागू करण्यात आली होती. पण आता ही सेवा राज्यभर देण्यात येणार आहे. त्याचबरोबर राज्यानं केंद्रसरकारच्या धर्तीवर माय गर्व्हमेंट ही सुविधा सुरू केली आहे. या सुविधेद्वारे राज्यातील जनता सरकारला आपल्या सूचना देऊ शकणार आहेत. गेल्या वर्षंभरात आपले सरकार या सुविधेद्वारे 24 हजार तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या, त्यापैकी 90 टक्के तक्रारींचं निवारण करण्यात आलं आहे. या विस्तारित सेवांमुळे लोकांचे मंत्रालय आणि सरकारी कार्यालयातले खेटे कमी होणार आहेत. या सेवेत जन्म दाखला, डोमिसाईल, सात बारा सारख्या दाखल्यांचा समावेश आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • appaso b. dhulaj

    I think ,Andhra government gives the highest number of online services through mee seva as of now

close