परभणीत ग्रामसभेत गोळीबार, 2 जणं जखमी

January 26, 2016 4:06 PM0 commentsViews:

crime

परभणीत – 26 जानेवारी : परभणीत ग्रामसभा भरली असतानाच गोळीबाराची थरारक घटना घडली. या गोळीबारात दोघं जण जखमी झालं आहेत.

26 जानेवारीनिमित्त परभणी तालुक्यातील साबळे भोगाव इथं ग्रामसभा भरली होती. यावेळी मनेरगाच्या कामावरुन वादावादी सुरु झाली. मनरेगाच्या कामाबद्दल विचारणा केल्यानं, उपसरपंच अशामती राऊत यांचा पती मनोज राऊत याने हवेत 3 गोळया झाडल्या. राऊत यांनी झाडलेली गोळी कोणाला लागली नाही, मात्र गोळी चाटून गेल्याने दोघे जण जखमी झाले. या गोळीबारानंतर गावात तणावाचं वातावरण आहे. दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close