शिक्षकाला भर चौकात जाळले

March 3, 2010 11:14 AM0 commentsViews: 6

3 फेब्रुवारीऔरंगाबादमधील गंगापूर तालुक्यात एका शिक्षकाला भर चौकात जिवंत जाळण्याची घटना घडली आहे. तालुक्यातील वरखड गावात धुळवडीच्या दिवशी हा प्रकार घडला. गणीलाला शाह असे मृत्यूमुखी पडलेल्या शिक्षकाचे नाव आहे. याप्रकरणी आरोपी संजय हिरामण गायकवाड, प्रकाश बाबासाहेब हिवार्डे, कचरु भागचंद उबाळे यांना अटक करण्यात आली आहे. रात्री बाराच्या दरम्यान शाह यांच्या अंगावर रॉकेल ओतून त्यांना पेटवून देण्यात आले. गंभीर भाजलेल्या शाह यांना गावकर्‍यांनी हॉस्पिटलमध्ये दाखल केले पण त्यांचा तिथे मृत्यू झाला. जखमी शाह यांनी जबाबात तिघा आरोपींची नावे पोलिसांना सांगितली. पण हा प्रकार नेमका का झाला, याचा उलगडा अजून झालेला नाही.

close