एका शोकांतिकेचा अंत…

March 3, 2010 1:38 PM0 commentsViews: 75

3 फेब्रुवारीबीडमधील आंबेजोगाई या गावातून एका सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या प्रमोद महाजन यांनी देशाच्या राजकारणात आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले. देशाचा भावी पंतप्रधान, असे त्यांचे चित्र मराठी माणसाने मनात रंगवले. पण 22 एप्रिलच्या भल्या सकाळी देश हादरला. बातमी होती, प्रमोद महाजन यांच्यावर त्यांच्या धाकट्या भावाने प्रवीण महाजनने गोळ्या झाडल्या…त्यानंतरच्या घटनाक्रमावर एक नजर टाकूयात…२२ एप्रिल २००६- सकाळी प्रमोद महाजन यांच्या वरळीतील 'पूर्णा' इमारतीतील घरात प्रवीणने त्यांच्यावर 3 गोळ्या झाडल्या. त्यानंतर प्रवीणने वरळी पोलीसस्टेशनमध्ये स्वत: जाऊन हत्या केल्याचे सांगितले आणि पिस्तुल पोलिसांच्या हवाली केले.कलम ३०७ खाली प्रवीणवर गुन्हा दाखल झाला. वरच्या मजल्यावर राहणारे माजी उपमुख्यमंत्री व प्रमोद महाजन यांचे मेव्हणे गोपीनाथ मुंडे यांनी तातडीने प्रमोद यांना माहीमच्या हिंदुजा हॉस्पिटलमध्ये दाखल केले. २७ एप्रिल- गोपीनाथ मुंडे व रेखा महाजन व अन्य कुटुंबियांचे जबाब नोंदवून घेण्यात आले. प्रमोद यांची मृत्यूशी झुंज३ मे- प्रमोद महाजन यांचा मृत्यू. प्रवीणवर ३०२ खाली हत्येचा गुन्हा१४ जुलै- वरळी पोलिसांनी प्रवीणविरुद्ध ६५० पानांचे आरोपपत्र२४ जुलै- शिवडी सेशन्स कोर्टात प्रवीणचा जामीन अर्ज १ ऑगस्ट- महाजन खून खटला भोईवाडा मॅजिस्ट्रेट कोर्टातून सेशन्स कोर्टात वर्ग. प्रवीणचा जामीन अर्ज फेटाळला२१ मार्च २००७- खटल्याचे कामकाज सुरू. सरकार पक्षाकडून साक्षीदारांची यादी सादर. पहिला साक्षीदार गौरव नांदगावकर याची साक्ष२२/२३ मार्च- रेखा महाजन यांची सरतपासणी. महाजनांवर गोळ्या झाडताना प्रवीणला पाहिल्याची रेखा यांची साक्ष१० एप्रिल- रेखा महाजन यांची उलटतपासणी. प्रवीणने 1 कोटी रुपयांसाठी प्रमोद यांना धमकावल्याची साक्ष ११ एप्रिल- प्रवीणने प्रमोद यांना धमकावणी देणारा एसएमएस पाठविल्याची गोपीनाथ मुंडे यांची साक्ष १२ एप्रिल- आपल्याला भाजप कार्यकतेर् धमकावत असल्याची सारंगी महाजनची तक्रार १५ एप्रिल- पूनम महाजन-राव यांनी प्रमोद यांचा मोबाइल पोलिसांच्या ताब्यात दिला १८ एप्रिल- प्रवीणविरुद्ध पुरवणी आरोपपत्र दाखल २६ एप्रिल- प्रज्ञा मुंडे यांची साक्ष. प्रवीण महाजन व त्यांच्या कुटुंबियांवर टीका ११ मे- प्रत्यक्षदर्शी साक्षीदार महेश वानखेडे याची साक्ष २९ ऑक्टोबर- प्रवीणचे म्हणणे कोर्टाने ऐकले. प्रमोद यांच्या घरी आपण गेल्याचे त्याने सांगितले. प्रमोद यांच्या चारित्र्याबाबत वादग्रस्त विधाने केल्याने खटला 'इन कॅमेरा' चालविण्याचा कोर्टाचा निर्णय १६ नोव्हेंबर- एसएमएस बदलता येतो याबाबत बचाव पक्षाचा साक्षीदार बी. हरीकृष्णन यांचे प्रात्यक्षिक २२ नोव्हेंबर- 'तो' एसएमएस प्रवीणने नव्हे, तर आपण पाठवल्याचे सारंगी महाजनचे निवेदन ३० नोव्हेंबर- दोन्ही बाजूंचा युक्तिवाद सुरू ६ डिसेंबर- निकालपत्राच्या वाचनास प्रारंभ १७ डिसेंबर- प्रवीण दोषी म्हणून घोषित १८ डिसेंबर- प्रवीणला जन्मठेपेची शिक्षा, नाशिक जेलमध्ये रवानगी27 नोव्हेंबर 2009- प्रवीण यांची 14 दिवसांसाठी पॅरोलवर सुटका3 फेब्रुवारी 2010- ठाण्यात ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये प्रवीण महाजन यांचा मेंदूतील रक्तस्रावामुळे मृत्यू

close