मनाई धुडकावून शिवजयंती साजरी

March 3, 2010 2:58 PM0 commentsViews: 5

3 फेब्रुवारीलोकसभाध्यक्ष मीरा कुमार यांची मनाई धुडकावून शिवसेनेच्या खासदारांनी आज संसद परिसरातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला फुले वाहिली. आणि छत्रपतींचा जयजयकार करत शिवजयंती साजरी केली. संसद परिसरातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार अर्पण करण्यास लोकसभा अध्यक्ष मीरा कुमार यांनी परवानगी नाकारली होती. त्यासाठी तांत्रिक अडचणीचे कारण दिले गेले होते. पण सेनेच्या खासदारांनी हा मनाई आदेश धुडकावून लावला.तिथीनुसार जयंतीशिवाजी महाराजांची आज तिथीनुसार 380 वी जयंती आहे. दरवर्षी फाल्गुन वैद्य तृतीयेला ही शिवजयंती साजरी होते. यानिमित्ताने आज राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. रायगडावर उत्साहकिल्ले रायगडावर आज शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. अनेक शिवप्रेमींनी गडावर गर्दी केली. जन्मोत्सवासाठी राज्यभरातून शिवप्रेमी रायगडावर जमले होते. यावेळी शिवप्रेमींनी रायगडावर ठिकठिकाणी पडलेला कचरा आणि प्लॅस्टिकच्या पिशव्या गोळा करुन परिसराची साफसफाई केली. स्मारक हवे सिंधुदुर्गातछत्रपती शिवाजी महाराजांच्या 309 फुटी उंच स्मारकासाठी मुंबईजवळ कृत्रिम बेट बनवण्यात येणार आहे. पण आता अशा मानवनिर्मित बेटाऐवजी निसर्गनिर्मित बेटावर अर्थात सिंधुदुर्गात हे स्मारक व्हावे, अशी मागणी भाजप आमदार प्रमोद जठार यांनी केली आहे. याबाबतच जठार जनहित याचिकाही दाखल करणार आहेत.

close