शरद पवारांना डिस्चार्ज, आठवडाभर विश्रांतीचा सल्ला

January 27, 2016 1:04 PM0 commentsViews:

sadasdpy

पुणे – 27 जानेवारी : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना आज (बुधवारी) सकाळी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. डिस्चार्ज मिळाल्यावर शरद पवार लगेचच स्पेशल हेलिकॉप्टरने मुंबईकडे रवाना झाले.

डॉक्टरांनी शरद पवार यांना एक आठवडा विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. मात्र, मला एका जागी बसण्याची सवय नाही. पुढील दोन महिने मला एकही दिवस सुटी घेता येणार नाही. त्यामुळे आता बघू कशी विश्रांती घेता येईल, असं शरद पवार यांनी पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयातून बाहेर पडल्यावर पत्रकारांना सांगितलं.

अस्वस्थ वाटू लागल्याने शरद पवार यांना रविवारी संध्याकाळी रुबी हॉल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली. माईल्ड फ्लुईलमुळे त्यांना अस्वस्थ वाटू लागले होते. रूबी हॉल क्लिनिकमध्ये 4 दिवस त्यांच्यावर उपचार करण्यात आलं होतं.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close