ज्येष्ठ समीक्षक डॉ. द. भि. कुलकर्णी यांचं निधन

January 27, 2016 2:16 PM0 commentsViews:

D B 1पुणे – 27 जानेवारी : ज्येष्ठ समिक्षक आणि 83 व्या पुणे साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. द. भि.कुलकर्णी यांचं आज इथल्या दीनानाथ रूग्णालयात उपचारादरम्यान निधन झालं. ते 82 वर्षांचे होते. त्यांच्या निधनानंतर साहित्यक्षेत्रावर शोककळा पसरली आहे.

मूळ नागपूरच्या असलेल्या द.भिंनी 1968 मधून नागपूर विद्यापिठातून पी.एच.डी.मिळवली. त्यांच्या अनेक ग्रंथांचा पुणे, नागपूर आणि उस्मानिया विद्यापिठात संदर्भ आणि अभ्यासग्रंथ म्हणून समावेश करण्यात आला आहे. 2010 मध्ये पुण्यात झालेल्या मराठी साहित्य संंमेलनाचे ते अध्यक्ष होते. ‘अंतरिक्ष फिरलो पण…’ या ग्रंथाला महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाड्मय पुरस्कार मिळाला होता.

बा. सी. मर्ढेकर यांच्यानंतरचे मराठीतले महत्त्वाचे समीक्षक म्हणून त्यांचं नाव घेतलं जातं. महाकथा ते महाकाव्य असा समीक्षेचा मोठा प्रवास होता. पिंपरी येथे नुकत्याच पार पडलेल्या 89व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात माजी संमेलनाध्यक्ष म्हणून द. भि. कुलकर्णी यांचा सत्कार करण्यात आला होता.

आज दुपारी एक वाजता पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close