अडवाणी आणि पंतप्रधान यांच्यात संसदेत खडाजंगी

March 3, 2010 3:13 PM0 commentsViews: 1

3 फेब्रुवारीलोकसभेत आज पंतप्रधान मनमोहन सिंग आणि भाजपचे नेते लालकृष्ण अडवाणी यांच्यात शाब्दिक चकमक झाली.भारताच्या परराष्ट्र धोरणापासून सध्याचे यूपीए सरकार फारकत घेत असल्याचा आरोप, अडवाणी यांनी केला. भारत-पाकच्या मुद्द्यात हस्तक्षेप नाही, असे अमेरिकेच्या यापूर्वीच्या सरकारचे धोरण होते. मग भारत-पाकने चर्चेने वाद सोडवावा, असे ओबामा वारंवार का सांगत आहेत? काश्मीरसारख्या मुद्द्यावर भारताने अमेरिकेशी गुप्त चर्चा तर केली नाही ना, असा सवाल अडवाणींनी केला. त्यावर अमेरिकेच्या धोरणात कोणताही बदल झाला नसल्याचे पंतप्रधान म्हणाले. एनडीए सरकारच्या काळात त्यावेळचे परराष्ट्रमंत्री जसवंत सिंग यांनीच अमेरिकेच्या परराष्ट्र राज्यमंत्र्यांशी गुप्त बैठका घेतल्या होत्या, असा आरोपही पंतप्रधानांनी केला.

close