50 वाघांची शिकार करणारा तस्कर पोलिसांच्या तावडीतून पळाला

January 27, 2016 4:07 PM0 commentsViews:

gadchiroli_@3भंडारा – 27 जानेवारी : वाघांची शिकार करणारा आंतरराष्ट्रीय तस्कर कुट्टु भंडारा पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळालाय. कुट्टूनं भंडारा आणि गडचिरोली जिल्ह्यात 5 वाघांची शिकार केल्याची कबुली दिली आहे. मध्य भारतात त्यानं तब्बल 50 वाघांची शिकार केल्याचा आरोप आहे.

सीबीआय आणि वन्यविभागानं त्याला गेल्या वर्षी मार्चमध्ये मध्य प्रदेशातल्या कटनी जिल्ह्यातून अटक केली होती. त्याची चौकशी झाल्यानंतर सीबीआयनं राज्याच्या वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन विभागाकडे त्याला सोपवलं. सध्या तो भंडार्‍याच्या मध्यवर्ती तुरुंगात होता. 4 दिवसांपासून वडसा इथं कोर्टातल्या तारखेसाठी 2 पोलीस त्याला बसमधून घेऊन जात होते. त्यावेळी लाखांदूर तालुक्यात दिघोरीजवळ टॉयलेटला जाण्यासाठी उतरला आणि पोलिसांच्या तावडीतून पळाला.

कोण आहे हा कट्टू ?
– कुट्टू छेलाल पारधी
– वय 28 रा.गिरोली जि.कटनी मध्यप्रदेश
– वाघ आणि इतर वन्यप्राण्यांची शिकार करुन त्याच्या अवयवांची आंतरराष्ट्रीय बाजारात तस्करी केल्याचा आरोप
– आतापर्यंत पन्नास वाघांची हत्या केलाचा संशय
– त्याला गेल्यावर्षी सीबीआय आणि वाईल्ड लाईफ क्राईम ब्रांचने 3 मार्च 2015 मध्ये अटक केली
– कटनी येथुन त्याच्या टोळीतल्या 46 जणांना आतापर्यंत वनखात्याने अटक केली होती
– नागझिरा अभयारण्यामध्ये असलेला राष्ट्रपती नावाचा वाघ तसेच अल्फा नावाची वाघीण 2013 जानेवरीपासुन बेपत्ता असून कुट्टूनेच त्यांची हत्या केल्याचा संशय

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close