शनी मंदिराचे विश्वस्त नरमले, ‘भूमाता ब्रिगेड’शी चर्चा करण्यास तयार

January 27, 2016 4:22 PM0 commentsViews:

shani_mandir_bhumataअहमदनगर – 25 जानेवारी : शनीदर्शन घेण्यासाठी मैदानात उतरलेल्या भूमाता ब्रिगेडच्या आंदोलनाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेतलीये. मुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतर आता शनी शिंगणापूर देवस्थानच्या विश्वस्तांनी आता थोडीशी नरमाईची भूमिका घेतली आहे. विश्वस्तांनी आपली भूमिका बदलत भूमाता ब्रिगेडशी चर्चा करण्याची तयारी दर्शवलीये.

काल देशभरात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा झाला पण, शनीदर्शनाचा हक्क मिळावा यासाठी कोल्हापुरात भूमाता ब्रिगेडच्या महिला कार्यकर्त्यांनी शिंगणापूरकडे कूच केली होती. पण, शनीदर्शन देणार नाहीच अशी भूमिका शनी मंदिर विश्वस्तांनी घेतली होती. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पाहात भूमाता ब्रिगेडच्या महिला कार्यकर्त्यांचा ताफा मध्येच अडवण्यात आला. या प्रकरणाचे देशभरात पडसाद उमटले. अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हस्तक्षेप केल्यानंतर विश्वस्तांनी सारवासारव केली आहे. त्यामुळे आता विश्वस्तांकडून लवकरच भूमाता ब्रिगेडला चर्चेचं निमंत्रण दिलं जाणार आहे. आता चर्चा होते का हे पाहावं लागणार आहे.

दरम्यान, शनीशिगंणापूर मुद्यावर राज्य सरकारने हस्तक्षेप करण्यापेक्षा मंदिराच्या ट्रस्टी आणि आंदोलक महिला यांच्यात संवाद होऊन मार्ग काढावा. हा सर्वस्वी निर्णय शनिशिगंणापूर ट्रस्टचा आहे. ज़र हा प्रश्न सुटला नाही तर सरकार हस्तक्षेप करेल अशी स्पष्टोक्ती भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी दिली.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close