लोणावळ्याजवळ 175 फूट खोल दरीत कोसळून गिर्यारोहकाचा दुर्दैवी मृत्यू

January 27, 2016 4:48 PM0 commentsViews:

praveen_shinde32पुणे – 27 जानेवारी : लोणावळ्याजवळ कामशेत इथं दरीत कोसळून गिर्यारोहकाचा मृत्यू झाला. प्रवीण शिंदे असं या गिर्यारोहकाचं नाव आहे.

कामशेत इथं ढाकची भैरी या ठिकाणी 26 जानेवारी रोजी गिर्यारोहणसाठी गेलेल्या प्रवीण शिंदे यांचा 175 फूट खोल दरीत कोसळून मृत्यू झालाय. ट्रेक दरम्यान डोक्यावर दगड पडल्याने प्रवीण शिंदे दरीत कोसळले. लोणावळ्याच्या शिवदुर्गच्या सदस्यांनी हा मृतदेह दरीतून काढला असून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close