मुख्यमंत्र्यांनी सपत्नीक शनीदर्शन घ्यावं, भूमाता ब्रिगेडची मागणी

January 27, 2016 5:51 PM0 commentsViews:

bhumata_cm_meetमुंबई – 27 जानेवारी : शनीदर्शन घेण्यासाठी मैदानात उतरलेल्या भूमाता ब्रिगेडच्या नेत्या तृप्ती देसाई यांनी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनी चौथर्‍यावर जाऊन सपत्नीक दर्शन घ्यावं अशी मागणी केलीये. याबद्दलच निवेदन त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिलंय.

शनीदर्शनाचा हक्क मिळावा यासाठी भूमाता ब्रिगेडच्या महिला कार्यकर्त्यांनी काल मैदान गाजवले. मात्र, त्यांना काही शनीदर्शन घेता आलं नाही. या प्रकरणाचे देशभरात पडसाद उमटले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात हस्तक्षेप केल्यानंतर विश्वस्तांनी सारवासारव केली आहे. त्यामुळे आता विश्वस्तांकडून लवकरच भूमाता ब्रिगेडला चर्चेचं निमंत्रण दिलं जाणार आहे. आता चर्चा होते का हे पाहावं लागणार आहे. तर दुसरीकडे भूमाता ब्रिगेडच्या नेत्या तृप्ती देसाई यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन निवेदन दिलं. त्यांनी या निवेदनात मुख्यमंत्र्यांनी शनि चौथर्‍यावर चढून सपत्नीक येऊन दर्शन घ्यावं आणि नवा आदर्श घालावा अशी मागणी केलीये. तसंच तातडीनं शनीदेवस्थानच्या विश्वस्तांना पाचरण करा, अशी मागणीही त्यांनी निवेदनात केलीये. मुख्यमंत्र्यांनी काल याबद्दल ट्विट केलं होतं.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close