पेट्रोलवाढ मागे घेण्यास सोनिया गांधींचा नकार

March 4, 2010 8:59 AM0 commentsViews: 2

4 फेब्रुवारीपेट्रोल आणि डिझेलच्या वाढीव किंमती मागे घेणार नसल्याचे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी स्पष्ट केले आहे. काँग्रेसच्या संसदीय समितीची आज बैठक होती. त्यावेळी सोनिया गांधींनी प्रणव मुखर्जी यांच्या भूमिकेला पाठिंबा दिला. प्रणव मुखर्जी यांनी मांडलेला अर्थसंकल्प हा उत्तम असल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले.अर्थसंकल्पात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केल्याने विरोधी पक्षासोबतच यूपीएतील तृणमूल काँग्रेस आणि द्रमुक हे मित्रपक्षही सरकार विरोधात आक्रमक झाले आहेत.त्यामुळे याबाबत काहीतरी तोडगा निघेल असे वाटत होते. पण आता सोनिया गांधीनीच स्पष्ट केल्याने पेट्रोल, डिझेलची दरवाढ कायम राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. पणयामुळे विरोधी पक्ष अधिक आक्रमक होण्याची शक्यता आहे

close