रावसाहेब दानवेंच्या हस्ते गुंडाचा भाजप प्रवेश

January 27, 2016 7:23 PM0 commentsViews:

rochkarउस्मानाबाद – 27 जानेवारी : उस्मानाबादमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी गुंडाला प्रवेश दिल्याचा आरोप होतोय. तुळजापूरच्या देवानंद रोचकरी याला दानवेंनी नुकताच भाजपात प्रवेश दिलाय.

खुद्द रावसाहेब दानवे यांनीच रोचकरीचा सत्कार करत प्रवेश दिलाय. पण, याच रोचकरीवर अनेक गुन्हे दाखल आहेत. म्हणूनच भाजपचेच जिल्हा उपाध्यक्ष संजय निंबाळकर यांनी पक्षाविरुद्ध बंड पुकारलंय. त्यांनी तडक राजीनामा दिलाय.

रोचकरीच्या पक्ष प्रवेशामुळे दानवेंवरही टीका होतेय. एवढंच नाहीतर जिल्ह्यातील अनेक कार्यकर्ते भाजपला रामराम ठोकण्याच्या तयारीत आहेत.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close