रेल्वेतून उतरणं महिलेच्या जीवावर बेतलं, मृत्यूचा थरार कॅमेर्‍यात कैद

January 27, 2016 8:17 PM0 commentsViews:

मुंबई – 27 जानेवारी : ‘चालत्या रेल्वेतून उतरू नका…’अशी सुचना वारंवार रेल्वे स्थानकांवर केली जाते पण एका महिलेला रेल्वेतून घाईघाईत उतरणं जीवावर बेतलंय. मुंबईतील बोरीवली स्टेशनवर ही धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना आहे 15 जानेवारीची…
रेल्वे सुरू असतांना एक महिला उतरण्याचा प्रयत्न करत होती. त्यावेळी तिचा पडून मृत्यू झाला आहे. किरण कोठारी असं या महिलेचं नाव आहे.borivali_cctv

किरण कोठारी आणि तिचा पती हे दोघे जण मुंबईहून बडोद्याला निघाले होते. मात्र, बडोदा एक्स्प्रेसमधून तिच्या पतीने तातडीने सामानखाली उतरवण्याची घाई केली. याच दरम्यान महिलेला उतरवतांना रेल्वेच्या वेगामुळे तिचा तोल गेला. ती खाली पडली आणि रेल्वे आणि स्टेशनच्या मधल्या गॅपमध्ये ती खाली गेली. तिला वाचवण्यासाठी तिच्यासोबत असलेल्या इसमाने बाहेर खेचण्याचा प्रयत्न केला पण तो निष्फळ ठरला आणि तिचा जीव गेला. हा सगळा थरारक प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला. रेल्वेतून, लोकलमधून प्रवास करतांना काळजी घेण्याची वारंवार सुचना केली जाते. परंतु, या सुचनांकडे दुर्लक्ष केल्यामुळे अशा अनेक प्रवाशांना आपल्या जीवाला मुकावं लागतंय.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close