तोडफोडीची भरपाई कोण देणार?

March 4, 2010 9:13 AM0 commentsViews: 2

4 फेब्रुवारीहॉटेल इंटरकॉन्टिनेंटल तोडफोड प्रकरणी झालेल्या नुकसानीची भरपाई आपण करणार की आपला पक्ष, अशी विचारणा मुंबई हाय कोर्टाने शिवसेनेचे माजी आमदार सीताराम दळवी यांना केली. गेल्या वर्षी 21 कामगारांच्या नोकरकपातीच्या मुद्दयावरून शिवसेनेने सहार विमानतळाजवळील हॉटेल इंटरकॉन्टीनेंटलमध्ये तोडफोड केली होती. या प्रकरणी माजी आमदार सीताराम दळवी यांच्यासह शिवसेना नेते संजय राऊत, सूर्यकांत महाडिक, अनिल परब अशा 41 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या तोडफोडीत 7 लाख 80 हजार रुपयांचे नुकसान झाले होते. यापैकी 2 लाखांची रक्कम आमदार दळवी यांच्याकडून वसूल करण्यात आली होती. '' 41 जणांवर गुन्हा दाखल असताना , भरपाई फक्त माझ्याकडूनच का ?'', अशी विचारणा करणारी याचिका आमदार दळवी यांनी दाखल केली होती. खंडपीठापुढे ही याचिका सुनावणीला आल्यानंतर ही भरपाई तुमचा पक्ष भरणार की तुम्ही, अशी विचारणा कोर्टाने केली. उद्या म्हणजेच शुक्रवारी पुन्हा या प्रकरणी सुनावणी होणार आहे.

close