मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात चाललंय काय?, गुंडाने काढली प्रजासत्ताक दिनी रॅली

January 27, 2016 10:57 PM0 commentsViews:

नागपूर – 27 जानेवारी : प्रजासत्ताक दिनाच्या नावाखाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर शहरात काय चाललंय असा प्रश्न उपस्थित झाला. एका कुख्यात गुंडाने भरदिवसा शहरात एक रॅली काढली. महत्वाच म्हणजे या रॅलीत शहरातील अनेक गुन्हेगारी पार्श्वभुमीचे लोक सहभागी झाले होते. महत्वाचं म्हणजे या रॅलीसाठी पोलिसांची परवागी घेण्यात आली नव्हती.ambekar23452

शहरात जागोजागी गुंड संतोष आंबेकरने नविन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी होर्डिंग्ज लावले होते. संतोष आंबेकरवर तीन वेळा मोक्का लावण्यात आला होता. तिन्ही वेळा मोक्का त्याच्या वरून हटवण्यात आला. या रॅलीच्या माध्यमातून आंबेकरने आपलं शक्तीप्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला. आयबीएन लोकमतने हे वृत्त दाखवल्यानंतर संतोष आंबेकरवर अखेर गुन्हा दाखल झालाय. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या गुंडांना घेऊन अशापद्धतीने शक्तीप्रदर्शन करण्याची पुन्हा कुणी हिम्मत करू, यासाठी ही कारवाई केल्याचं पोलिसांनी सांगितलंय.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close