आता कैद्यांसाठीही एटीएम

January 28, 2016 8:46 AM0 commentsViews:

nag_jailनागपूर – 28 जानेवारी : जेलमधील कैद्यांना महिन्याकाठी मिळणारी मजुरी आणि नातेवाईंकांनी जमा केलेले पैसे काढण्यासाठी एटीएम देण्याची योजना नागपूर जेलपासून सुरू करण्यात आली आहे. एसबीआय बँकेनं यासाठी पुढाकार घेतलाय.

महिन्याला 2000 रुपये खर्च करण्याची मर्यादा आता 2500 रुपये करण्यात आली आहे. या पैशातून कैदी जेलमध्ये साबणापासून – बीडीपर्यंत जेलसर्कुलरनुसार वस्तु विकत घेऊ शकतो. जेलमधील कैद्यांनी जर वर्षभर योग अभ्यास केला तर त्याला 3 महिने शिक्षा माफ होऊ शकते अशीही नवी सवलत आता लागू झाली आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close