वाघाची विषारी ‘शिकार’ करणारी टोळी जेरबंद

January 28, 2016 9:03 AM0 commentsViews:

thane_tigar_hunter3ठाणे – 28 जानेवारी : वाघाला विष देऊन त्यांची शिकार करून कातडे विकणार्‍या एका चार जणांच्या टोळीला ठाणे पोलिसांच्या कल्याण युनिटने अटक केली आहे. त्यांच्याकडून 7 लाखाचे बिबट्याचे कातडे, 70 हजार रुपये किंमतीची वाघनखे आणि मोबाईल असा एकूण 7 लाख 73 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

या टोळीने या आधी सुद्धा अशाच पद्धतीने वाघाची शिकार केल्याचे तपासात उघड झाले आहे. त्याचा ही शोध आता गुन्हे शाखा घेतेय. या टोळीत संदीप शिंगरे, महादेव वरघडे, देहू हमभर, आणि आकाश फगे यांचा समावेश आहे. हे सगळे रायगड जिल्ह्यातील पाली तालुक्याचे रहिवासी आहेत. त्यांनी याआधी देखील असे गुन्हे केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या चौघांवर वन्य जीव सुरक्षा कायद्याखाली गुन्हा दाखल केला असून त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close