मंदिरातील चेंगराचेंगरीत उत्तर प्रदेशात 65 ठार

March 4, 2010 10:33 AM0 commentsViews: 5

4 फेब्रुवारीउत्तर प्रदेशातील प्रतापगढ जिल्ह्यातील राम जानकी मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीत 65 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 400 लोक जखमी झाले आहेत.कृपालू महाराजांच्या आश्रमातील भंडार्‍याच्या कार्यक्रमाच्या वेळी ही दुर्घटना घडली. या धार्मिक कार्यक्रमासाठी हजारो भाविक जमा झाले होते. त्यात महिला आणि मुलांची संख्या जास्त होती.यावेळी राम-जानकी मंदिराची बांधकाम सुरू असलेली भव्य कमान कोसळली. या कमानीच्या ढिगार्‍याखाली तसेच त्यानंतर झालेल्या चेंगराचेंगरीत अनेक भाविकांचा मृत्यू झाला. यातील अनेक जखमींना अलाहाबादला नेण्यात आले आहे. प्रतापगढपासून 75 किलोमीटरवर हा कृपालू महाराजांचा आश्रम आहे. अजूनही या ठिकाणी मदतकार्य सुरू आहे.

close