खारघरमध्ये अग्नितांडव, 3 घरं जळून खाक

January 28, 2016 8:20 AM0 commentsViews:

kharghar_34नवी मुंबई – 28 जानेवारी : नवी मुंबईतील खारघर सेक्टर 20 मधील गिरीराज हॉरीझोन या इमारतीमध्ये बुधवारी रात्री भीषण आग लागली. या आगीत या टॉवर मधील 3 घरं जळून ख़ाक झाली. रात्री 9 च्या सुमारास 15 व्या माल्यावरील घराला ही भीषण आग लागली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

गिरीराज हॉरीझोन या इमारतीमध्ये लागलेली आग ही इतकी भीषण होती की, या आगीच्या झळा या 14 आणि 16 व्या मजल्यावरील घरात गेल्याने इतर दोन घराना ही आगीने कवेत घेतल्याने ही घर देखील जळून ख़ाक झाली. घरात आग लागताच या घरातील लोकांनी बाहेर पळ काढला. आगीच रौद्ररूप बघुन नवी मुंबई महापालिकेची ब्रांटो लिफ्ट तत्काळ मागवण्यात आली.

या ब्रांटो लिफ्टच्या मदतीने ही आग विझवण्याचा प्रयत्न करण्यात आला. सिडको,पनवेल आणि नवी मुंबई महापालिकेच्या पाच बंबांनी ही आग रात्री उशीरा विझवली. या आगीत कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाली नाही. मात्र, या भीषण आगीत तीनही घरं जळून ख़ाक झाली. या आगीत कोट्यवधी रूपयांच नुकसान झालंय. आगीच कारण अद्याप स्पष्ट झालं नसलं तरी ही आग शॉक सर्किटमुळे लागली असल्याचा प्राथमिक अंदाज अग्निशमन दलाने व्यक्त केला आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close