सेल्फीच्या नादात परदेशी पर्यटक पडली विहिरीत

January 28, 2016 12:23 PM0 commentsViews:

राजस्थान – 28 जानेवारी : सेल्फीचा मोह किती असावा यालाही काही मर्यादा असायला हव्यात. पण, सेल्फीच्या नादापायी मागील महिन्यात मुंबईत दोन मुलींचा मृत्यू ओढवला होता. त्यानंतर मुंबईत काही भाग नो सेल्फी झोन म्हणून घोषित करण्यात आले. पण राजस्थानमधल्या जुनागढमध्ये एक ऑस्ट्रियाची पर्यटकही अशाच सेल्फीच्या नादात विहिरीत पडली.

autruyan34फ्रिडेल ही तरुणी जुनागढमधला किल्ला बघायला आली होती. इथं सेल्फी काढतांना तिचा तोल गेला आणि ती विहिरीत पडली. तिचा आरडाओरडा ऐकून आजुबाजूचे लोक तिथं आलं आणि त्यांनी तिला बाहेर काढलं. सुदैवाने तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी वेळीच तिला वाचवलं त्यामुळे तिचा जीव वाचला.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

आणि टि्वटवर फाॅलो करा


close