पाकमध्ये तिरंगा फडकावणार्‍या विराटच्या ‘त्या’ फॅनला 10 वर्षांचा तुरुंगवास ?

January 28, 2016 1:28 PM0 commentsViews:

28 जानेवारी : भारताचा तडाखेबाज फलंदाज विराट कोहलीचा एका पाकिस्तानी फॅनने आपल्या घरावर तिरंगा फडकावला. त्यामुळे त्याला आता 10 वर्षांचा तुरुंगवास होऊ शकतो. उमर दराज असं या फॅनचं नाव आहे.virat_fan34

त्याचं झालं असं की, विराटनं ऑस्ट्रेलियाविरोधात पहिल्या टी-20मध्ये 90 रन्स ठोकले होते. विराटच्या या तुफान फटकेबाजीमुळे उमर दराजने आपल्या घरावर तिरंगा ध्वज फडकावला. दराज हा पंजाबच्या ओकारा प्रांतात राहतो. हा भाग पाकिस्तानात येतो. दराजने घरावर तिरंगा ध्वज लावल्यामुळे त्याची तक्रार पोलिसांत करण्यात आली.

26 जानेवारीला पोलिसांनी दराजला ताब्यात घेतलं. त्याच्यावर कलम 123 ए नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्याला कोर्टात हजर करण्यात आले असता कोर्टाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली. या गुन्ह्याखाली दराजला 10 वर्षांचा तुरुंगवास होऊ शकतो. परंतु, मी, विराटचा खूप मोठा फॅन आहे. आपण जे काही केलं ते विराटच्या प्रेमापोटी केलं. मी भारतीय टीमचा समर्थक आहे. आणि अधिकार्‍यांनी ही बाब लक्षात घेऊन मला सोडून द्यावं अशी विनंती दराजने केलीये.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close