अशोक चव्हाणांची ‘आदर्श’ चौकशी करू द्या, सीबीआयची राज्यपालांकडे विनंती

January 28, 2016 5:07 PM0 commentsViews:

aadarsh scam

मुंबई – 28 जानेवारी : आदर्श घोटाळयाप्रकरणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण अडचणीत आले आहेत. या प्रकरणी अशोक चव्हाणांची चौकशीची परवानगी मिळावी यासाठी सीबीआयने पुन्हा एकदा महाराष्ट्राचे राज्यपाल सी विद्यासागर राव यांच्याकडे अर्ज केला आहे. जर राज्यपालांनी त्याला मंजुरी दिली तर अशोक चव्हाण यांना सीबीआयच्या कारवाईला सामोरे जावं लागेल.

अशोक चव्हाण यांच्यावर कारवाईसाठी मंजुरी द्यावी, अशी मागणी करणार अर्ज यापूर्वीही सीबीआयने तत्कालिन राज्यपाल के. शंकरनारायणन यांच्याकडे दिला होता. मात्र, त्यावेळी तो फेटाळण्यात आला होता. त्यानंतर सीबीआयनेच कोलांटउडी मारत चव्हाण यांचं नावच आरोपींच्या यादीतून वगळण्याची केलेली मागणी कोर्टाने फेटाळली होती. मात्र, या निर्णयाचा फेरविचार करण्यात यावा या मागणीसाठी खुद्द चव्हाणांनीच कोर्टात धाव घेतली होती. ती याचिकाही मुंबई हाय कोर्टाने फेटाळली होती. या सर्व पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा अशोक चव्हाण यांच्यावर कारवाईसाठी सीबीआयने राज्यपालांकडे परवानगी मागितली आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close