लॅक्मे फॅशन वीक उद्यापासून

March 4, 2010 11:19 AM0 commentsViews: 1

4 फेब्रुवारीमुंबईत उद्यापासून लॅक्मे फॅशन वीक 2010 ची धूम सुरू होत आहे. यावेळी किती डिझायनर्स सहभागी होणार, यंदाचा लॅक्मे फॅशन वीक कसा रंगणार, याची उत्सुकता सगळ्याच फॅशन प्रेमींना लागली आहे. मुंबईतील हॉटेल ग्रँड हयात इथे 5 मार्च ते 9 मार्चपर्यंत ही धूम सुरू होणार आहे. फॅशन इंडस्ट्रीतील 61 डिझायनर्सचे डिझाईन्स यावेळी सादर होतील. त्यापैकी 40 डिझायनर्स नामांकीतआहेत. डिझायनर विक्रम फडणीस, नरेंद्र कुमार, सब्यासाची मुखर्जी आणि मनिष मल्होत्रा यांचे डिझाईन्स नेहमीप्रमाणे यंदाच्या लॅक्मे फॅशन वीकचे आकर्षण असेल. आणि त्याला जोड असेल ती सेलिब्रिटी शो स्टॉपर्सची. गेल्या वर्षीच्या लॅक्मे फॅशन वीकमध्ये जागतिक मंदीचा परिणाम जाणवला होता. त्यामुळे परदेशी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी हा सीझन कितपत यशस्वी ठरतो याबाबत उत्सुकता आहे.

close