तुझा लढा सुरूच…

January 28, 2016 8:10 PM1 commentViews:

women-powerकधी शबरीमलासाठी
कधी शिंगणापुरसाठी
कधी आरक्षसणासाठी
कधी हुंडाबळी थांबवण्यासाठी
तुझी आन्दोलनं सुरूच आहेत
प्रत्येक वेळी नाव वेगळ असलं तरी
हक्कासाठी,न्यायासाठी
या आंदोलनाना कदाचित यश येईलही
मिळेलही प्रवेश तुला चौथऱ्यावर
थांबतीलही कदाचित 
हुंडा बळी
मिळेलही कदाचित तुला समान संधी कागदावर तरी
पण त्या लढयाचं काय करशील गं?
जो अवीरतपणे सुरु आहे
तुझ्या जन्मपासून मृत्युपर्यंत
जो संक्रमित होतो पुढच्या पिढीत 
वारसाहक्कानं मिळालेल्या संपत्तिसारखा
हवं ते बोलण्याचा
हवं ते खाण्याचा
हवे ते कपडे घालण्याचा
मनमुराद हसण्यासाठीचा
आणि तो लढा जिंकू शकशील?
जन्माला येण्याचा आणि येऊ देण्याचा?

- केतकी जोशी, IBN लोकमत


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


  • Samadhan Khodke

    bhariii….

close