गिरगाव चौपाटीवर ‘मेक इन इंडिया’च्या कार्यक्रमास हाय कोर्टाचा नकार

January 28, 2016 6:57 PM0 commentsViews:

High corur

मुंबई – 28 जानेवारी : येत्या 13 फेब्रुवारीपासून मुंबईत सुरू होणार्‍या ‘मेक इन इंडिया’ महोत्सवाअंतर्गत गिरगाव चौपाटीवर होणार्‍या कार्यक्रमास मुंबई हाय कोर्टाने परवानगी नाकारली आहे. चौपाटीवर विसर्जन सोहळा वगळता कोणालाही राजकीय कार्यक्रम अथवा सभा घेता येत नाही. या पार्श्वभूमीवर कोर्टाने चौपाटीवर होणार्‍या शासनाच्या ‘मेक इन इंडिया’ कार्यक्रमाला परवानगी देण्यास नकार दिला.

‘मेक इन इंडिया सप्ताहा’दरम्यान ‘मेक इन मुंबई’ या संकल्पनेच्या दृष्टिने गिरगाव चौपाटीवर 13 ते 18 फेब्रुवारी दरम्यान अनोख्या आयोजनांचा राज्य सरकारचा बेत होता. त्यासाठी राज्य सरकारने चौपाटीवर कार्यक्रमाच्या परवानगीसाठी कोर्टात अर्ज दाखल केला होता. गिरगाव चौपाटीवर होणारा कार्यक्रम राजकीय नसून तो जनतेसाठी खुला आहे. कार्यक्रमला पंतप्रधान नरेंद्र मोदींसह विविध देशांचे प्रतिनिधी देखील उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे या कार्यक्रमाचं महत्त्व लक्षात घेता कोर्टाने त्याला परवानगी द्यावी, अशी बाजू सरकारच्या वतीने कोर्टात मांडण्यात आली होती. मात्र, कोर्टाने युक्तीवाद फेटाळून लावत कार्यक्रमाला परवानगी नाकारली.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close