जर्मन बेकरी पुन्हा उभी राहणार

March 4, 2010 12:16 PM0 commentsViews: 2

4 फेब्रुवारीपुणे बॉम्बस्फोटात उध्वस्त झालेली जर्मन बेकरी पुन्हा उभी राहणार आहे. ही बेकरी सुरु करायला पोलिसांनी परवानगी दिली आहे. बॉम्बस्फोटात या बेकरीचे प्रचंड नुकसान झाले होते. बेकरीच्या मालक स्मिता खरोसे यांनी पतीच्या निधनांनंतर मोठ्या कष्टाने ही बेकरी चालवून नावारूपाला आणली होती. मात्र स्फोटात ती उद्‌ध्वस्त झाली. पण तपास सुरू असल्याने तिची दुरुस्ती किंवा पुन्हा उभारणी करण्यास पोलिसांची परवानगी नव्हती. आता पोलिसांनी ही परवानगी दिली आहे.

close