मुंबईत जुहूच्या समुद्रकिनार्‍यावर आढळला 35 फुटी मृत व्हेल मासा

January 29, 2016 10:20 AM0 commentsViews:

मुंबई – 29 जानेवारी : मुंबईत जुहूच्या समुद्रकिनार्‍यावर काल रात्री 35 फुटी मृत व्हेल मासा आढळून आला. लाटांसोबत व्हेल किनार्‍यावर वाहत आल्याचं मच्छिमारांचं म्हणणं आहे. हा व्हेल ब्रुडीज जातीचा असल्याचं समजतंय. या व्हेल माशाचं वजन तब्बल 20 टन आहे.
समुद्राला भरती आल्याने काल रात्री हा मासा वाहून जुहूच्या किनार्‍यावर पोहोचला आणि वाळूत रुतून बसला. त्याच्या शरीरावर अनेक जखमा आहेत. या व्हेल माशांचं शवविच्छेदन केलं जाणार आहे. आणि त्याचा सांगाडाही जतन करून ठेवण्यात येईल असं सांगण्यात आलंय. wheel_fesh


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close