झिंगुबाई बोलके यांना स्त्री-शक्ती पुरस्कार

March 4, 2010 12:22 PM0 commentsViews: 4

4 फेब्रुवारीकेंद्र सरकारचा या वर्षाचा '' राणी गाई देन्लू झिल्यांग स्त्री-शक्ती पुरस्कार,'' अकोला येथील समाजसेविका झिंगुबाई बोलके यांना जाहीर झाला आहे. 3 लाख रुपये रोख आणि स्मृतीचिन्ह या स्वरुपात हा पुरस्कार देण्यात येतो. येत्या 8 मार्चला म्हणजे अंतरराष्ट्रीय महिला दिनी दिल्लीत राष्ट्रपती प्रतिभा पाटील झिंगुबाईंना हा पुरस्कार देणार आहेत. स्वत: अपंग असूनही अनेकांच्या जीवनात आत्मविश्‍वास जागवणार्‍या झिंगुबाईंना या आधी अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्या गेली 25 वर्षे साक्षरता, बचतगट, वृक्षारोपण, व्यसनमुक्ती अशा अनेक माध्यमांतून काम करत आहेत. आपल्या कविता आणि गाण्यांमधूनही त्यांनी समाजप्रबोधन केले आहे.

close