सुटाबुटातल्या भोंदूबाबावर पोलीस कारवाई करणार की नाही ?

January 29, 2016 12:34 PM1 commentViews:

vasai_bhondubabaवसई – 29 जानेवारी : ईश्वराच्या दैवीशक्तीद्वारे रूग्णांना बरं करण्याच्या नावाखाली फसवणार्‍या सुटाबुटातल्या भोंदूबाबाचा आयबीएन लोकमतने पर्दाफाश केलाय. 24 तास उलटूनही या भोंदूबाबावर कोणतीही कारवाई अजून झालेली नाही. वसईतला मॉर्डन भोंदू भोळ्याभाबड्या रुग्णांची बिनदिक्तपणे फसवणूक करतोय तरीही पोलिसांकडून त्याविरोधात अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यांतर्गत कारवाई होत नाहीये.

वसईच्या आशीर्वाद प्रार्थना केंद्र या ठिकाणी जी शिबीरं सुरू असतात, त्यामध्ये असाध्य आजार झालेल्या रुग्णांना खडखडीत बरं करण्याचा दावा हा भोंदूबाबा करतो. सबॅस्टिअन मार्टिन असं या भोंदूबाबाचं नाव आहे. राजरोस आणि खुलेआम सुरू असलेल्या या शिबिरांचे व्हिडीओ युट्यूब आणि इतर सोशल मीडियावरही आहेत. पण पोलिसांना किंवा सरकारला याची कल्पनाच नाही. जादूटोणा विरोधी कायदा असतानाही या सबॅस्टिनवर कारवाई का होत नाही? त्याला अटक का होत नाही ? हाच खरा प्रश्न आहे. म्हणूनच आम्ही पीडित रुग्णांना या भोंदूगिरीविरोधात आवाज उठवण्याचं जाहीर आवाहन करतोय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


  • Pranay Naik

    इसलिये मैं तुम से कहता हूं, कि जो कुछ तुम प्रार्थना करके मांगों तो प्रतीति कर लो कि तुम्हें मिल गया, और तुम्हारे लिये हो जाएगा। [मरकुस ११:२४] yaha vachan padho bible me…..ibn lokmat ……..iss vachan se yahi prove hota hai ki agar tum (yeshu ke naaam se jo prarthana karke mangoge samjho tummhare liye ho gaya……iss vachan ka matlab tum vishwas rakho tummhare liye jo kuch jesus se manga gaya hai vo ho jayega………yaha pe vishwas aur dhiraj ke .. bareme bataya gaya hai……..

close