शिर्डी : कचर्‍याच्या गाडीतून नेलेल्या वृद्धाचा मृत्यू

January 29, 2016 1:12 PM0 commentsViews:

shridi_kacharagadi29 जानेवारी : एका आजारी निराधार वृद्धाला रुग्णवाहिकेऐवजी थेट कचरा गाडीतून रुग्णालयात नेण्याचा धक्कादायक प्रकार शिर्डीत घडला. दुदैर्वाने या रुग्णाला रुग्णालयात घेऊन जात असतांना वाटेतच मृत्यू झाला.

शिर्डीत लाखो गरीब भिक्षा मागून आपली गुजराण करतात. त्यातलाच हा एक वयोवृद्ध भाजी मंडईजवळ आजारपणामुळे खितपत पडल्याचं सामाजिक कार्यकर्ते अमोल कोते यांनी नगरपालिका आणी शिर्डी रूग्णालयात कळविले. पण, वारंवार सांगूनही कोणी दखल घेतली नाही. त्यामुळे कोते स्वत: गाडी आणायला गेले. गाडी घेऊन येईपर्यंत नगरपालिकेने गाडी पाठवली खरी पण ती होती कचरा गाडी…आणि याच कचरा गाडीत बसवून या व्यक्तीला सफाई कर्मचार्‍यांनी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

वास्तविक शिर्डी संस्थानचं भव्य रूग्णालय आहे. त्यासाठी दहा ऍम्ब्युलन्सही आहेत पण गरीब अनाथ रूग्णासाठी एकही रूग्णवाहिका पाठवण्याची मानसिकता मात्र संस्थानच्या प्रशासनाकडे नाही. दुदैर्वाने या रुग्णाला कचर्‍याच्या गाडीतून घेऊन जात असतांना मृत्यू झाला.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close